Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 282 नवीन रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशे च्या   वर आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आली आहे  . गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 282नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 211रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 94हजार  436 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 83हजार 343इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 7रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील3तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8902जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2022अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 210रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9728 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading