पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 399 नवीन रुग्ण

पुणे:  शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तिनशेच्या  वर आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 399 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 216 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 94हजार  185 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 83हजार 221इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील9 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8898जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2066अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 208रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8961 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: