Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 197 नवीन रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या खालीआली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आली आहे  . गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 197नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 222रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 91 हजार  862 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 80हजार 900इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 12रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील6 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 6रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8855जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2077अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 209रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7619 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply