पीएमपी – रक्षाबंधन निमित्त शहरात 300 जादा बसेस धावणार

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी रविवार ( २२ ऑगस्ट २०२१)  “रक्षाबंधन” निमित्त पुणे परिवहन महामंडळामार्फत मार्गावर धांवणाऱ्या दैनंदिन बस संख्येपेक्षा 300 जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

दरवर्षी “रक्षाबंधन” च्या  दिवशी मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतो. यास्तव दरवर्षीप्रमाणे परिवहन महामंडळाने “रक्षाबंधन” चे दिवशी प्रवाशांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी दैनंदिन संचलनात असलेल्या (११२५ बसेस) नियोजीत बसेस व्यतिरिक्त जादा ३०० बसेस अशा एकुण १४२५ बसेसचा ताफा महामंडळाकडून मार्गावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याकरिता वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच महत्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी  अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. “रक्षाबंधन” रविवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजी असल्यामुळे यावर्षी दिनांक २२ व २३ ऑगस्ट २०२१ या दिवशी जादा बसेसचे नियोजन केलेले आहे. तसेच महामंडळाकडील अधिकारी, लिपीक व इतर कर्मचारी यांची महत्वाच्या स्थानकांवर व थांब्यांवर प्रवाशांना मार्गदर्शन करणेकामी व वाहतूक नियंत्रण करणेकामी नेमणूक करण्यात आली आहे.

तरी पीएमपीएमएल कडून सोडण्यात आलेल्या जादा बसेस / वाहतुक व्यवस्थेची नोंद प्रवाश्यांनी  घेवुन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: