Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

स्मृतिदिनी निर्भय मॉर्निंग वॉक करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन

पुणे : ‘विवेकाचा आवाज – बुलंद करूया’ या घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी ‘मारेकरी माहीत हाय, कारवाईचे काय ?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आठव्या स्मृतिदिनी निर्भय मॉर्निंग वॉक करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेने निर्भय मॉर्निंग वॉक आयोजित केला होता.

डॉ. दाभोलकर यांचा खून झाला, त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुल येथून ते महानगरपालिकेच्या आवारातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यन्त हा वॉक झाला. यावेळी घोषणा, गाणीही सादर झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, महाराष्ट्र अंनिसचे सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, प्रकाशन विभागाचे विशाल विमल, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद किर्दत, मिलिंद चव्हाण, संकेत मुनोत, शिवाजीनगर पुणे शाखेचे अध्यक्ष वनिता फाळके, कार्याध्यक्ष संदीप कांबळे, सचिव विनोद खरटमोल आणि विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रणिता वारे, मयूर पठारे, घनश्याम येणगे, अविनाश इंगळे यांनी गाणी सादर केली. प्रा. सुभाष वारे, डॉ. ठाकसेन गोराणे, विशाल यांनी मनोगत व्यक्त केले. 

स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मेणबत्त्या पेटवून विवेक जागर

– ‘आमचे नाते विचारांचे – आम्ही वारस विवेकाचे’, ‘आवाज दो – हम एक है’ या घोषणा देऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आठव्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेने डॉ. दाभोलकर यांचा खून झाला, त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता. गीतांद्वारे अभिवादन करून मेणबत्ती पेटून विवेक जागर केला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading