महापारेषणच्या कर्मचाऱ्यांचे 23 रोजी प्रलंबीत प्रश्नांवर धरणे व निदर्शने आंदोलन
पुणे: महावितरण महापारेषण कंपनीतील कर्मचान्यांच्या विविध प्रलंबीत प्रश्नासाठी वेळोवेळी पत्राद्वारे व बैठकीद्वारे चर्चा करूनही महापारेषणच्या प्रशासनाने प्रश्नांची सोडवणूक न केल्याने इंटक फेडरेशनने दि .२३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजले पासून इंटक फेडरेशन चे अध्यक्ष तथा मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली वीज कर्मचान्यांच्या खालील विविध मागण्यांवर न्याय मिळवून घेण्यासाठी बेमुदत धरणे व निदर्शन आंदोलन
महापारेषण , प्रकाशगंगा , बांद्रा ( पूर्व ) मुंबई येथे सर्व कर्मचारी, व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत इंटक फेडरेशनचे मुख्य महासचिव .प्रकाश गायकवाड यांनी दिली .
यावेळी कार्याध्यक्ष गोविंदराव थोपटे, उपाध्यक्ष आबा पाटील, राष्ट्रीय मजदूर संघ पुणे अध्यक्ष सुनिल शिंदे, महापारेषणचे सचिव प्रकाश ठाकरे , संघटक शप्रविण लांडे उपस्थित होते.
प्रकाश गायकवाड म्हणाले , महापारेषणच्या सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केले कि , 23 ऑगस्ट रोजी पासून सुरू होणाऱ्या बेमुदत धरणे व निदर्शने आदोलनास सर्वांनी आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्यावर न्याय मिळागेकरिता सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या
१ ) अनुकंपातत्वावरील उमेदवारांना महापारेषण कंपनीच्या सेवेत त्वरीत सामावून घेण्यात यावे .
२ ) कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थीना कंपनीच्या सेवेत महानिर्मिती कंपनीच्या धर्तीवर ५० % आरक्षण देऊन सामावून घेण्यात यावे
३) सन २०१६-२१ या ५ वर्षाच्या काळात स्टाफ सेटअपच्या नावाखाली प्रशासनाने वर्ग ३ व ४ च्या संवर्गाचे पदोन्नती पॅनल घेतलेले नाहीत . त्यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केलेले आहे त्यामुळे जुन्या पध्दतीनेच प्रथमत : पदोन्नती पॅनल त्वरीत घेण्यात यावेत .
४ ) वरिष्ठ यंत्रचालक ते कनिष्ठ अभियंता यांची पदोन्नती कपनीचे परिपत्रक क्र .४५६ दि . ५/११/२०१५ नुसार घेणे गरजेचे असतानाही गेली ६-७ वर्ष पदोन्नती पॅनल घेतलेले नाहीत , तरी सदरये पदोन्नती पॅनल त्वरीत घेण्यात यावेत .
५) महापारेषण कंपनीतील नाशिक परिमंडळातील सुरक्षारक्षक यांना सुधारीत वाढीव दराने माहे मे २०१३ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीचा वेतनातील फरक त्वरीत देण्यात यावा .
