Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 182 नवीन रुग्ण तर 216 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे:पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आतआली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आली आहे  . गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 182 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 216रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 91 हजार 444 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 80हजार 424इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 18रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील12 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 6रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8874 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2146अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 208रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9668 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading