fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बैलगाडा शर्यत – पडळकरांचा पोलिसांना चकवा, सागर-सुंदर जोडीने पटकाविले 1 लाख 11 हजारांचे बक्षीस

सांगली : बैलगाडा शर्यतीसाठी बंदी असतानाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे- वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर पहाटे शर्यती झाल्या. शर्यत संपन्न झाल्याचं सांगताच पडळकर समर्थकांनी एकच जल्लोष केला. पोलिसांच्या चोख बंदोबस्ताला चुकवून गनिमी काव्याने आंदोलन संपन्न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

आटपाडी तालुक्यातील झरे या गावी बैलगाडा शर्यत होणार असल्याचं सांगत गोपीचंद पडळकरांनी सरकारला आव्हान दिलं होतं. ही शर्यत होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन सज्ज झाले होती. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांनी कटेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शर्यत स्थळावरही पोलिस उपस्थित होते. मात्र, पोलिसांना चकवा देत पडळकरांनी रातोरात दुसऱ्या जागेवर मैदान तयार करत शर्यत भरवली आहे. गोपीचंद पडळकरांनी पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवून बैलगाडा शर्यती पार पडल्या. झरे गावात बैलगाडा शर्यत पार पडणार होती. मात्र पोलिसांनी गावच्या मुख्य मैदानाची धावपट्टीच उखडून टाकली होती.

दरम्यान, पाच बैलजोड्यांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत सागर- सुंदरने शर्यतीचं मैदान मारुन 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading