Thursday, November 19, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

कोरोना – देशात गेल्या 24 तासांत 36 हजार 571 नवीन पॉझिटिव्ह, 540 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, धोका अद्याप टळलेला नाही. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 36 हजार 571 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 540 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्येत घट होऊन 3 लाख 63 हजार 605 वर पोहोचली आहे. जी गेल्या 150 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

राज्यात काल (गुरुवारी) 5 हजार 225 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 557 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 14 हजार 921 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93 टक्के आहे. 154 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. एकूण 33 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात आज एकाही मृत्यूची नोंद नाही.  सध्या राज्यात 3,29,047 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,614 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या लसींच्या डोसची संख्या 57.16 कोटींच्या पार पोहोचली आहे. तर, गुरुवारी 48 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. लसीकरण अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर 37 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांपैकी 18-44 वयोगटातील एकूण 21,13,11,218 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर एकूण 1,79,43,325 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

Leave a Reply