Thursday, November 19, 2026
BusinessLatest NewsPUNE

झेनो हेल्थची आता पुण्यात सेवा

पुणे :  नुकतेच  झेनो हेल्थने पुण्यात चार स्टोअर्स सुरू केली. वाकड, एनआयबीएम कोंढावा, वानवडी आणि सदाशिव पेठ-टिळक रोड येथे ही स्टोअर्स आहेत. या स्टोअर्समध्ये ऑफलाइन आणि ऑनलाइन  अशा दोन्ही पद्धतीत ग्राहकांना सेवा मिळेल. झेनो ही जेनेरिकवर भर देणारी कंपनी आहे. ग्राहकांना शिक्षित करण्यावर त्यांचा भर आहे. पुणे शहरात झेनो हेल्थ सुरू करून अधिक सोयीस्कर इन-स्टोअर अनुभव देण्यावर भर असणार आहे. पुण्याच्या ग्राहकांना आता प्रिस्क्रिप्शन ऑनलाइन देऊन सवडीने औषधे दुकानातून घेता येईल. त्यांना अॅपवर औषधांची यादी तपासून अधिक माहितीही मिळवता येईल. झेनोचे आरोग्य तज्ज्ञ ग्राहकाच्या प्रिस्क्रिप्शनचा इतिहास तपासतात व त्यांना योग्य निदान सेवा, मार्गदर्शन आणि साह्य मोबाइल अॅपच्या माध्यमातून पुरवले जातील.

यावेळी झेनो हेल्थचे सहसंस्थापक गिरिश अग्रवाल म्हणाले की,  आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये पुण्यात ३० हून अधिक नवे स्टोअर्स सुरू करण्याची आमची योजना आहे. दर्जा देत पुण्याच्या लोकांच्या आयुष्यात बदल घडवणे आणि जेनेरिक्स आणि हेल्थकेअर क्षेत्रात अग्रेसर बनणे हे आमचे लक्ष्य आहे.   झेनो हेल्थ हा असा एक रिटेल फार्मसी ब्रँड आहे जो प्रत्यक्ष (ब्रिक अॅण्ड मोर्टार स्टोअर) आणि डिजिटल (वेबसाइट आणि लॉयल्टी अॅप) अशा दोन्ही जगांना एकत्र आणून ग्राहकांना ब्रँडशी जोडले जाण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. औषधांची घरपोच सेवा देण्यासाठी त्यांनी आपल्या सेवा व्यापक केल्या, वेबसाइट आणि मोबाइल अॅप सादर केले आणि स्टोअरमध्ये येऊ न शकणाऱ्या ग्राहकांना साह्य करण्यासाठी खास कॉल सेंटर सुरू केले. अशा अनेक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.

Leave a Reply