fbpx
Saturday, May 11, 2024
Latest NewsNATIONALTOP NEWS

…तर माझीही हत्या झाली असती- अशरफ घनी

नवी दिल्ली – “आपण अफगाणिस्तानातच थांबलो असतो तर माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नजीबुल्लाह प्रमाणे आपली ही हत्या झाली असती; मी तालिबान्यांना घाबरून देश सोडला नसून, एक जबाबदार लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून देश सोडल्याचं”, वक्तव्य करीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे आज संगळ्यांसामोर आले आहेत. 

तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर अशरफ घनी यांनी देश सोडल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर ते कोठे गेले? ही चर्चा होती. आज घनी यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत सध्या आपण संयुक्त अरब अमिरातीमध्ये आश्रय घेतला असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.   

पैसे आणि चार गाड्या घेवून देश सोडल्याच्या बातमीचे खंडन करीत घनी यांनी कोणत्या परिस्थितीत आपण देशातून पलायन केलं याबद्दल भाष्य केले आहे. “मी तातडीने देश सोडला की मला माझ्या स्लिपर्स आणि बूट सोबत घेण्यासही वेळ मिळाला नाही. एक पारंपारिक कपड्यांचा जोड, एक कोट आणि घातलेल्या सॅण्डल एवढ्या तीन गोष्टी सोबत घेऊन मी देश सोडला,” असा दावा घनी यांनी केलाय. फेसबुकवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये घनी यांनी “मी तिथेच थांबलो असतो तर अफगाणी जतनेच्या डोळ्यांसमोरच त्यांनी निवडून दिलेल्या राष्ट्राध्यक्षाला पुन्हा फासावर लटकवलं असतं,” असं म्हटलं आहे. मोहम्मद नजीबुल्लाह या अफगाणी राष्ट्राध्यक्षाला तालिबानने २७ सप्टेंबर १९९६ रोजी गोळ्या घालून ठार केलं होतं. त्यानंतर त्यांचा मृतदेह काबूलमधील राजवाड्यासमोरच्या सिग्नलवर लटकवण्यात आला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading