Sunday, September 27, 2026
ENTERTAINMENTLatest News

दीपिका – ऋतिक पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. दोघेही सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ या आगामी चित्रपटात आपल्याला एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच शुटींग यापूर्वीच सुरु झाले असून दीपिका आणि ऋतिकची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या चर्चा रंगल्या आहेत.  हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज केला जाणार होता. मात्र आता हा चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी रिलीज करण्यात येणार आहे.

‘काही दिवसांपूर्वीच ऋतिकनं दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक सिद्धार्थ यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. तर वायकॉम 18 स्टुडियोचे प्रोड्यूसर अजीत अंधेरेंनी  ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “2023 च्या प्रजासत्ताक दिनी तयार राहा भारताचा पहिला वहिला हवाई अॅक्शनपट फायटरसाठी. ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण बॉक्स ऑफिसवर येत आहेत.

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading