आम्ही मुद्याला मुद्याने आणि वेळ पडल्यास गुद्याला गुद्याने उत्तर द्यायला सक्षम – संभाजी ब्रिगेड
पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दीच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात जेम्स लेनच्या मुद्यावर भाष्य करून पुरोगामी संघटना आणि त्यांच्या नेत्यावर जहरी टीका केली होती. तसेच एका मुलाखतीत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात जातिवाद पसरवल्याचा ठप्पका ठेवला होता. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रभर वणवा पेटला होता. आणि या वनवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संभाजी ब्रिगेडने उडी घेतली होती. मात्र हा वणवा शमण्याचे नाव घेत नाही. त्यातच पुणे शहराचे मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी म्हंटले होते. “प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरकून देणार नाही.”
राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत त्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्ट द्वारे काही मुद्दे उपस्थित केले होते. आज पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेध्ये प्रवीण गायकवाड समर्थक यांनी म्हटले की राज ठाकरे यांच्या समर्थकांना त्या मुद्द्याचा प्रतिवाद किंवा खंडन करता आले नाही.
मुद्द्याचे उत्तर देताना न आल्याने नगरसेवक वसंत मोरे यांनी फेसबुक वरून प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरणे मुश्कील करू ! असे आव्हान दिले होते .त्याबाबत संभाजी ब्रिगेड ची भूमिका अशी आहे. की देशात लोकशाही शासन असून घटनेने सर्वांना अभिव्यक्ती आणि संचार स्वातंत्र्य दिले आहे.
पुणे शहर ही कोणाच्या बापाची जहागिरी नाही. संभाजी ब्रिगेड मुद्याला मुद्याने आणि वेळ पडल्यास गुद्याला गुद्याने उत्तर द्याला सक्षम आहे. या पत्रकार परिषदेला सुधीर राजे भोसले प्रदेश कार्याध्यक्ष, अमोल काटे, छगन शेरे ,प्रदीप कनसे प्रदीप बेलदरे, अजय सावंत ,विशाल सूर्वे ,हर्षवर्धन मगदूम उपस्थित होते.
