Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

पोलिस आयुक्त कार्यालयाच्या गेटवर तरुणाने स्वःताला घेतले पेटवून

पुणे : पोलिस आयुक्त कार्यालयाच्या गेटवर तरुणाने स्वःताला पेटवून घेतल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

सुरेश पिंगळे यांना नोकरीसाठी नाहरकत प्रमाणपत्र पाहीजे म्हणून वारंवार पोलिस आयुक्त कार्यालयात चकरा मारत होते मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे कारण देत पोलिसांनी नाहरकत प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर सुरेश पिंगळे यांनी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासमोरच स्वःताला पेटवून घेतले

सुरेश पिंगळे यांना शनिवारवाडा येथील सुर्या रुग्णालयात दाखल केले असून प्राथमिक स्वरूपात ते ८५ टक्के भाजल्याची माहीती उपलब्ध झाली आहे. सुर्या रुग्णालयाबाहेर नातेवाईक जमल्याने पुणे पोलिसांनी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. सदर रुग्णालयाच्या बाहेर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply