पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 266 नवीन रुग्ण
पुणे: शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या वर आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आल्याने महानगरपालिकेची व आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 266 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 215 कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 91 हजार 008 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 80हजार 089इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 21रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 13तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 8रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8863 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2057 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 202 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9604 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
