जगासाठीची मेड इन इंडिया क्रांती
हवामान बदल हे वास्तव आहे आणि ही परिस्थिती उलट करण्याची गरज आहे. आपल्यापैकी कुणालाच ही गोष्ट नवीन नाही. आणि मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांनाच बदल हवा आहे. पण उलटा हवामान बदल आपण कसा करायचा आणि एक देश म्हणून एकत्रितपणे प्रगती कशी करायची हा प्रश्न आहे.
भारतात विकल्या जाणाऱ्या वाहनांपैकी ८०% वाहने ही दुचाकी आहेत आणि तरी केवळ १२% भारतीयांकडे दुचाकी आहेत. या वाहनांना दरवर्षी १२,००० कोटी लीटर इंधन लागते आणि एकूण वायू प्रदूषणापैकी ४०% प्रदूषणाला ती जबाबदार आहेत.
आगामी वर्षात हे प्रमाण आणखी वाढणार हे स्पष्ट आहे आणि आपण असं होऊ देता कामा नये. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे हा आता पर्याय नाही तर महत्वपूर्ण, निर्णायक गोष्ट बनली आहे.
परंतु अशा प्रकारच्या बदलासाठी जागतिक पातळीवर आणि त्या गुणवत्तेची नाविन्यपूर्णता आणि उत्पादकता यांची गरज लागते. त्यासाठीच आम्ही ओला फ्युचर फॅक्टरीमधून – जगातली सर्वात मोठी दुचाकी फॅक्टरी- बाजारपेठेत आजच्या दिवशी नवीन उत्पादन सादर करत आहोत. दुचाकी वाहनांमधील ही क्रांती आहे. याला ओला एस १ म्हणतात आणि साध्या सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर आजवरची बनवण्यात आलेली ही सर्वोत्तम स्कूटर आहे.
शाश्वत आणि क्रांतीकारी अशी दोन्ही प्रकारची उत्पादने बनविणे हे आमचे ध्येय आहे आणि एस१ च्या निर्मितीतून आम्ही तेच साध्य केले आहे. याची रचना सर्वोत्तम आहे, कामगिरी सर्वोत्तम आहे आणि तंत्रज्ञान ही सर्वोत्तम आहे.
सर्वोत्तम डिझाईन: सॅटिन, मॅट आणि ग्लॉसी फिनिश मधील १० उठावदार रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या ओला एस १ मध्ये चमकदार दोन हेडलँम्प्स, इर्गोनॉमिक आणि द्रवीय बॉडी, सर्वोत्कृष्ट मिश्रधातू चाके, आरामदायी बैठक आणि दोन हेल्मेट्स व्यवस्थित मावू शकतील इतकी सर्वाधिक बूट स्पेस आहे.
सर्वोत्तम कामगिरी: १८१ किलोमीटर पर्यंतची रेंज, ३.० सेकंदात ०-४० ताशी किलोमीटरचा वेग आणि ताशी ११५ किलोमीटरचा सर्वाधिक वेग या वैशिष्ट्यांमधून या क्षेत्रात नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. ताशी ३.९७ किलोवॅटची बॅटरी क्षमता, अत्याधुनिक इलेक्ट्रिक व्हेईकलपेक्षा ३०% नी जास्त आणि ८.५ किलोवॅट पॉवरसह या मालिकेतील सर्वाधिक शक्तिशाली मोटर.
ओला एस१ मध्ये विशेष बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम (बीएमएस) असून जास्तीत जास्त काळ टिकाऊपणा, कामगिरी, रेंज आणि सुरक्षा यासाठी बॅटरीचे काम कार्यक्षमतेने चालण्यासाठी महत्वाचे ठरते.
सर्वोत्तम तंत्रज्ञान: बाजारपेठेत आता उपलब्ध असणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत प्रचंड अत्याधुनिक तंत्रज्ञान एस१ मध्ये आहे. याला किल्ली नाही आणि ‘डिजीटल किल्ली’ वैशिष्ट्याने ही गाडी तुमच्या फोनशी जोडली जाते. त्यामुळे तुम्ही गाडीच्या जवळ आलात की कळू शकते आणि तुम्ही आपोआप गाडी अनलॉक करू शकता. तुम्ही लांब जाताच गाडी स्वतःला लॉक करून घेते. बहुविध मायक्रोफोन क्षमता, अंतर्गत बसवलेले कृत्रिम बुद्धिमत्ता प्रेरित वाचा ओळख अलगॉरिदम आणि सुस्पष्ट, तेजस्वी ७ इंच टचस्क्रीन डिस्प्ले यात आहे.
आमच्या होमग्रोन मूव्हओएसमुळे ग्राहक केवळ गाडीचा लूक आणि दृश्यता अनुभवू शकतात असे नाही तर स्कूटरचा आवाज कसा येतो याचाही अनुभव घेऊ शकतात. बोल्ट, केअर, व्हिंटेज आणि वंडर असे चार मूड्स सादरीकरणावेळी असून तुमच्या त्या दिवशीच्या मनस्थिती नुसार तशा आवाजाचा अनुभव घेता येऊ शकतो. जोडीला तुम्हांला ज्या प्रकारे गाडी चालवायची असेल त्यानुसार नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर हे मोड्स ठरविता येऊ शकतात.
दुचाकी वाहनांमध्ये दुर्मिळ असणारी अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आम्ही यामध्ये समाविष्ट केली आहेत. ओला एस१ मध्ये चोर विरोधी दक्षता यंत्रणा आहे. जिओ फेन्सिंग आहे आणि आगविरोधी आणि पाणी आणि धूळ विरोधी बॅटरी आहे. पुढे आणि मागे डिस्क ब्रेक्स आहेत आणि रहदारीच्या वेळी ‘हाय होल्ड’ वैशिष्ट्यामुळे गाडी चालवणे आणि दिशादर्शन अधिक सोपे जाते.
११०/७० आर १२ टायर्स, मागचे मोनोशॉक सस्पेन्शन आणि पुढच्या बाजूचे फोर्क सस्पेन्शन यामुळे खूप चांगल्या प्रकारची पकड येते आणि गाडी चालवण्याचा सुखद अनुभव मिळतो. वाहन चालविणे आरामदायी, सोयीचे करणारा क्रुझ मोड आणि गाडी आरामात पार्क करण्यासाठीचा रिव्हर्स मोड खूप फायदेशीर आहेत.
सुरक्षिततेसाठीची मजबूत व्यवस्था, बाजूची पायरी आणि आरामदायी बैठक यामुळे मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठीही या गाडीवरून जाण्याचा अनुभव सुखद आहे. स्कूटर मध्ये व्हॉईस रेकग्निशन असल्यामुळे तुमचं किल्ली संदर्भातील काम झटपट होऊ शकतं.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीसाठीचे सर्वात मोठे आव्हानही ओला एस १ ने पेलले आहे. ओला एस१ ९९,९९९ रुपयांच्या पुढे या क्रांतिकारी किमतीत उपलब्ध होणार आहे.
