‘ बेस्ट इनोव्हेशन अॅवार्ड ‘चे वितरण
पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै आयसीटी अॅकॅडमीतर्फे १० विद्यार्थ्यांना ‘ बेस्ट इनोव्हेशन अॅवार्ड ‘ देऊन गौरविण्यात आले.डॉ. कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन ( रामेश्वर ) च्या रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी संबंधी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. वैजनाथ राऊत, मिलिंद चौधरी, राहुल शाह, संस्थेचे सहसचिव इरफान शेख, पै आयसीटी अॅकॅडमीच्या संचालक अंजुम काजळेकर हे उपस्थित होते.
