Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

ट्रेलब्लेझर्स ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर

पुणे : ट्रेलब्लेझर्स जावा रायडर ग्रूप, पुणे यांच्या वतीने मार्केटयार्ड येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य आनंदऋषी ब्लड बँक व जावा ग्रीन गिअर्स शोरुम यांच्या विशेष सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले.

यावेळी माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, चंदन सुरतवाला, संग्राम शेलार, महेश दसमाने आणि किरण सोमा हे उपस्थित होते. रक्तदानाचे शिबीराचे नियोजन स्वप्नील शिरोळकर यांनी केले.

ट्रेलब्लेझर्स हा फक्त रायडर्स ग्रुप नसून सामाजिक कार्यामध्ये देखील अग्रेसर आहे. राईड सोबत सामाजिक संदेश देणे हा या ग्रूपचा मुख्य उद्देश आहे. कोरोना काळात देखील या ग्रूपने अनेक मदत कार्ये केली आहेत.

ग्रुपच्या संस्थापक सुरभी त्रिपाठी, तेजस्विनी बर्गे-घाडगे, मोना शाही, संस्थापक सदस्य अजित लांडगे, ओम शेलार, सर्वेश विचारे, शशिकांत पेडामकर, शशांक काळे, संदीप पाटील, अक्षय चांदणे, सुनील नायर, आणि निहार प्रधान यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply