Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

हुलगेश चलवादी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

पुणे : कलाकारांना वेळोवेळी सर्व प्रकारची मदत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठया प्रमाणात आयोजन करण्यात येणार असून कोरोना महामारीमुळे सर्व कलाकारांचे कला प्रदर्शन अनेक महिने बंद असल्याने आजच्या कार्यक्रमामुळे एकमेकांना भेटून आनंद लुटला ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाची अमृतमहोत्सवी भेट मिळाली असल्याचे मत बहुजन समाज पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड कलाकार संघाचे वतीने विद्यानगर ,पुणे येथे चलवादी यांना समाजभूषण पुरस्कार जेष्ठ अभिनेते वसंतराव अवसरीकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी ते बोलत होते .यावेळी कलाकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार उलपे ,साई दरबारचे बबलू दुग्गल ,शाहीर राहुल शिंदे, गायक संकल्प गोळे ,लावणी कलाकार अलका जगताप ,संगीता लाखे , होम मिनिस्टर सदरकर्ते क्रांतीनाना मळेगावकर ,बालकलाकार सह्याद्री मळेगावकर ,उपाध्यक्ष पी.चंद्रा ,मिठू पवार ,संजय मगर ,राजेश डेव्हिड , हेमा कोरभरी , बाळासाहेब निकाळजे , गणेश गायकवाड ,शिल्पा भवार आदी उपस्थित होते.

याप्रसंगी ऍड रेणुका चलवादी यांच्या हस्ते कलाकार मंडळींना अन्नधान्याचे किट व छत्र्यांचे वाटप करण्यात आले .यासाठी ग्लोबल ग्रुप पुणेचे संजीव अरोरा यांचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली. चलवादी शिक्षण संस्थेच्या वतीने सर्वांचे विमा पॉलीसी फॉर्म ,महात्मा फुले शहरी गरीब योजना फॉर्म व रमाई घरकुल आवास योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले तसेच उपस्थित कलाकारांसाठी ग्लोबल हेल्थ केअरच्या वतीने मोफ़त वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तशेच कोरोना काळात मदत करणाऱ्या सुजाता कांबळे ,मुराद काझी ,कुमार पाटोळे ,आमिर शेख ,यशवंत डोळस यांना कोरोना योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्श्वगायक चित्रसेन भवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिठू महादेव पवार यांनी विशेष सहकार्य केले. 

Leave a Reply