Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

एअर मार्शल भुषण गोखले राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

पुणे :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सेवानिवृत्त एअर मार्शल भुषण गोखले तसेच त्यांच्या पत्नी मेघना गोखले यांना आदर्श माता-पिता सन्मान देऊन सन्मानित केले. बन्सी रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्ट यांच्या वतीने हा सन्मान राजभवन पुणे येथे मंगळवारी (दि. १७) प्रदान करण्यात आला. सैन्य दलातील सेवानिवृत्त ज्येष्ठ अधिकाऱ्यांना समाजसेवा व देशसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान प्रतिवर्षी देण्यात येतो. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा सुषमा चोरडिया, सुर्यदत्त समुहाचे अध्यक्ष डॉ संजय चोरडिया, सिद्धांत चोरडिया व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply