कार्यकर्तांच्या प्रामाणिक कामाने पक्ष आणि नेते घडतात; बाळासाहेब मालुसरे यांच्या कडून निष्ठावान कार्यकर्त्यांचे कौतुक
पुणे: पुणे शहर हे व्यवसायाच्या दृष्टीने देखील एक महत्त्वाच शहर आहे. किंतु शहरातील व्यावसायिकांकडे कुणाचे ही लक्ष दिसून येत नाही हे व्यापारी वर्गाचे दुर्भाग्य. कोरोना मुळे वर्षभर दुकाने बंद, अनलॉक मध्ये वेळेचे बंधन, दुकान भाड्यात नो सवलत, लाईट बील, जीएसटी, बँकांचे हाप्ते, कर्मचार्यांचा पगार आदि अनेक गोष्टी आहेत ज्यावर उपाय म्हणून काहीही पाऊल सरकारने घेतलेले नाही. अशा परिस्थितीत व्यापार्यांनी स्वतःला व कुटुंबाला आधार द्यावा तरी असा हा मोठा व प्रमुख प्रश्न मंडई विद्यापीठ कट्टावर आज उपस्थित करण्यात आला.
मंडई विद्यापीठ, पुणे कट्टावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील काही सामाजिक तर राजकीय कार्यकर्ते आमंत्रित केले होते. यामध्ये संदीप आटपाळकर, रवी कांबळे, प्रसाद गावड़े,सनी किरवे, गौरव पिंपळे, वसंत कांबळे, सागर भोसले, राजूशेठ अग्रवाल, संजय पाचरेकर संतोष भूतकर, अक्षय कालेकर, हर्षद मालुसरे आदी उपस्थित होते. पुण्यातील व्यापार- व्यवसाय, जीएसटी, कौटुंबिक समस्या, सरकारी यंत्रणा आदी विविध प्रश्नावर, तसेच सामाजिक व राजकीयदृष्ट्या शहरातील कामे व विकास योजना आदी मुद्यावर मंडई कट्टावर चर्चा झाली. मंडई विद्यापीठ कट्टा, पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांच्या वतीने सर्व आमंत्रित मान्यवराचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला.
बाळासाहेब मालुसरे म्हणाले, दर शनिवारी आम्ही मंडई विद्यापीठ कट्टा घेतो त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर आमंत्रित केले जातात. आजतागायत कट्टावर २५०० हून अधिक मान्यवर येऊन गेले. कट्टावर विवीध विषयावर चर्चा होते, त्यातून येणारे विचार समाजासाठी कशे उपयुक्त ठरेल यावर मिमांसा केली जाते. त्याच क्रमांत आज चर्चा करण्यासाठी शहरातील काही सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आमंत्रित केले होते. कोरोना मुळे उद्भवलेल्या समस्या व त्यावर उपाय योजना संदर्भात कट्टावर मनसोक्तचर्चा आज झाली.
