स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि काँग्रेसने दिलेले योगदान नव्या पीढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येक कार्यकत्याचे कर्तव्य आहे – रमेश बागवे
पुणे : ‘‘भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व काँग्रेसचा इतिहास हा एकच आहे. स्वातंत्र्याचा लढा हा लोकमान्य टिळक, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आजाद आदी थोर स्वातंत्र्य सेनानींच्या नेतृत्वाखाली लढला गेला. या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि काँग्रेसने दिलेले योगदान नव्या पीढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येक कार्यकत्याचे कर्तव्य आहे. असे मत कॉँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी आपले ते बोलत होते. यावेळी आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, व्यर्थ न हो बलिदान या अभियानाचे समन्वयक ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, नीता रजपूत, वीरेंद्र किराड, अरविंद शिंदे, लता राजगुरू, अविनाश बागवे, डॉ. सतिश देसाई, नितीन परतानी, अनिल सोंडकर, द. स. पोळेकर, रमेश अय्यर, संगीता तिवारीआदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बागवे म्हणाले, महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या मार्फत ब्रिटीश सरकारच्या जुलमी कायद्याला विरोध केला. १५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रज सरकारने देशाची सत्ता भारताकडे सुपूर्त केली. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काँग्रेसचे सर्व नेते, क्रांतीकारी, लाखो सत्याग्रहींना तुरूंगवास भोगावा लागला. अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी अनेक धाडसी पाऊल उचलले. भाक्रा नांगल धरण, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, पुण्यातील NDA, हिंदुस्थान ॲन्टीबॉटिक्स, हिंदुस्थान ॲरॉनोटिक्स सारखे कारखाने स्थापन केले. IIT, IIM, सारख्या संस्था स्थापन करून देशाला आधुनिकीकरणाकडे नेले. त्यानंतरचे पंतप्रधान लाल बहाद्दूर शात्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव व डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला प्रगत देश बनविले. हे फक्त काँग्रेसच्या पुरोगामी विचारामुळेच शक्य झाले.
यानंतर स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटूंबियांचा सन्मान ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार व शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आडेकर यांनी केले. तर आभार नगरसेवक अजित दरेकर यांनी मानले.
