fbpx
Thursday, May 2, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 128 नवीन रुग्ण


पुणे: शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या जवळपास आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 128 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 185 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 90 हजार 574 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 79 हजार 686 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 09 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8853 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2035 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 203 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6272 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading