Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

पोखरीतील शैक्षणिक क्रांतीस पुण्यातील गणेश मंडळांचे योगदान

पुणे : अध्यात्माचा समृद्ध वारसा लाभलेले पुणे जिल्ह्यातील ठिकाण म्हणजे भीमाशंकर . या अभयारण्यात आजही अनेक छोटी गावे ,पाडे आणि वस्त्या दुर्गम आणि सोया सुविधा नसल्याने उच्च शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या आहेत .भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यातल्याच एका दुर्गम अशा पोखरी गावात शैक्षणिक क्रांती आकार घेत आहे .

या गावात प्रथमच ‘पंढरीनाथ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ‘ उभे राहत आहे.या महाविद्यालयाच्या रूपाने उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या व आजूबाजूच्या गावांमध्ये शिक्षण गंगोत्री अवतरणार आहे .या महाविद्यालयामुळे या आदिवासी भागातील कित्येक पिढ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली होऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यात क्रांती घडणार आहे. अशा या उदात्त आणि क्रांतिकारी कार्यासाठी पुण्यातील गणेश मंडळे आपले सहकार्य देत खारीचा वाटा उचलत आहेत. या महाविद्यालयास विद्यार्थी व शिक्षक यांच्यात ज्ञानाचा दुवा साधता यावा म्हणून 4×6 चे 14 व्हाईटबोर्ड व मार्कर पेन देण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना पियुष शहा म्हणाले ,”दुर्गम भागात होत असलेल्या या शैक्षणिक क्रांतीस आमचे हे छोटेसे योगदान आहे. या महाविद्यालयामुळे आता इथल्या अनेक पिढ्यांची शिक्षणासाठीची वणवण थांबेल.याच भागात राहून त्यांना दर्जेदार शिक्षणही घेता येईल आणि येथील भीमाशंकरच्या समृद्ध निसर्गाचे पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनही करता येईल .”
याप्रसंगी, पियुष शाह, अतुल वाकणकर मित्र परिवार ,जय गणेश व्यासपीठ पुणे शहर ,वीर शिवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष किरण सोनिवाल ,नवज्योत मित्र मंडळ येरवडा चे अध्यक्ष अमित जाधव, विधायक मित्र मंडळ, यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्वांनी तिरंगी ध्वज व पोस्टर्स लावून या फळ्यांचे पूजन केले .
गणेश मंडळाकडून देण्यात आलेल्या भेटीचा पंढरीनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत साळवे सर व त्यांचे सहकारी सीताराम जोशी सर यांनी स्वीकार केला. साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ साईबाबा मंदिर ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते  

Leave a Reply