Wednesday, November 18, 2026
Latest NewsSports

ऑलिंपिकमधल्या भारताच्या यशाची पायाभरणी करणाऱ्या स्वर्गीय खाशाबा जाधव यांना उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

मुंबई : ऑलिंपिकमधल्या भारताच्या यशाची पायाभरणी करणाऱ्या स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, “1952 च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्तीचं कांस्यपदक जिंकून देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू पैलवान खाशाबा जाधव यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या मातीतल्या कुस्तीला सातासमुद्रापार गौरव मिळवून देणाऱ्या, ऑलिंपिकमधल्या भारताच्या आजच्या यशाची पायाभरणी सत्तर वर्षांपूर्वी करणाऱ्या महाराष्ट्राच्या महान सुपुत्रास, पैलवान खाशाबा जाधव यांना स्मृतिदिनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन.”

Leave a Reply