झी मराठीवर ऑगस्ट महिन्यात येत आहेत ‘हे’ ७ नवीन कार्यक्रम
झी मराठी या वाहिनीने गेल्या २२ वर्षांत प्रेक्षकांसोबत एक अतूट नातं निर्माण केलं. ही फक्त एक वाहिनी नसून मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. झी मराठी आता नवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि निमित्त आहे २२वी वर्षपूर्ती. ‘नव्या नात्यांच्या, बांधू गाठी मी मराठी, झी मराठी’ या नवीन टॅगलाईन सोबत आता झी मराठी नवीन रूपात बहारदार नवीन कार्यक्रमांची मेजवानी घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
झी मराठी ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांसाठी ७ नवीन कार्यक्रम सादर करणार आहे जे प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. त्यात ‘ती परत आलीये’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘मन झालं बाजिंद’, ‘मन उडु उडु झालं’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या ५ नवीन कार्यक्रमांचा समावेश असून ‘रात्रीस खेळ चाले ३’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे नवीन भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसंच ‘घेतला वसा टाकू नको’ हा कार्यक्रम देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नवीन कार्यक्रमातून अनेक लोकप्रिय कलाकार – श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, विजय कदम, हार्दिक जोशी, हृता दुर्गुळे प्रेक्षकांच्या मोनोरंजनासाठी सज्ज होणार आहेत.
