Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

केेंद्राने लसी उपलब्ध केल्यानेच महाराष्ट्र लसीकरणात नंबर एकवर – देवेेंद्र फडणवीस

मुंबई :  देशात सर्वाधिक लसीकरणाचा टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे नंबर एकचे राज्य बनले असल्याचे महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले तर मग या लसी कुठून आल्या. केेंद्र सरकारने लसी उपलब्ध करुन दिल्यानेच लसीकरणात महाराष्ट्र एक नंबरवर गेले असल्याचे फडणवीसांनी सांगितले. 

देवेेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने कोणतीही हालचाल केली नाही. इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरिता जे मनुष्यबळ आणि निधी राज्य मागासवर्ग आयोगाने मागितले आहे. त्यापैकी काहीच देण्यात आलेले नाही. केवळ वेळकाढू धोरण सुरू आहे. 2022 मध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तीन चतुर्थांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. तोपर्यंत हा विषय अधांतरी ठेवायचा आहे. जेणे करून त्या निवडणुकीत ओबीसी समाजाला कोणतेही राजकीय आरक्षण राहणार नाही. केवळ टाईमपास करणे सुरू आहे.

मराठा आरक्षणावेळी चार महिन्यात राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा तयार केला होता. राज्य सरकारचा इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे राज्याला हे करता येते. चार महिन्यांपेक्षा जास्त वेळ होऊन गेला आहे. पंधरा महिने झाले. पण सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारची भुमिका दुटप्पी आहे. या सरकारला आरक्षण द्यायचे नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले अशी जाहिरातबाजी महाविकास आघाडी करत आहे. तर मग या लसी कुठून आल्या. त्या काय आकाशातून टपकल्या की जमिनीतून उगवल्या. या सर्व लसी केेंद्रातल्या मोदीजींच्या सरकारने दिल्या आहेत. आज देशात महाराष्ट्र अव्वल नंबर आहे ते या लसी मिळाल्यामुळेच आहे.

Leave a Reply