Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाचे योगदान मोलाचे – डॉ.पी. ए. इनामदार

पुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त ‘‘व्‍यर्थ न हो बलिदान’’ या अभियानाच्या अंतर्गत छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन महाराष्ट्र कॉस्मॉपॉलीटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, शरद रणपिसे, बाळासाहेब शिवरकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड.अभय छाजेड, आबा बागुल, अरविंद शिंदे, सोनाली मारणे, संगीता तिवारी, निता परदेशी, अविनाश बागवे, रमेश अय्यर, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, सेवादलाचे प्रकाश पवार, चैतन्य पुरंदरे, राहुल तायडे, अक्षय सोनावणे आदी उपस्थित होते.

 डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेत्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला. महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग स्विकारून विविध आंदोलने केली. त्या काळात एक म्हण असायची की ब्रिटीश साम्राज्यात सूर्य कधी मावळत नाही. परंतु महात्मा गांधींच्या सत्याग्रही आंदोलनामुळे ती म्हण खोटी ठरली. अहिंसेच्या मार्गाने आणि क्रांतीकारकांनी केलेल्या क्रांतीमुळे भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. या छायाचित्रांमार्फत स्वातंत्र्य चळवळीचे अनेक टप्पे दाखविण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यांच्या चळवळीत आणि देशाच्या प्रगतीसाठी काँग्रेस पक्षाने केलेले कार्य समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविले पाहिजे. फक्त पदाशी बांधिलकी न ठेवता पक्षाशी बांधिलकी ठेवली पाहिजे.’’

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात अॅड. अभय छाजेड म्हणाले की, ‘काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. स्वातंत्र्य चळवळ आणि काँग्रेस हे शब्द एकमेकांपासून वेगळे काढता येणार नाहीत. देशासाठीचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. कोणी तसा प्रयत्नही करू नये.’’

 रमेश बागवे म्हणाले, ‘‘भारताचा खरा इतिहास नष्ट करण्याचे काम सध्याचे केंद्रातील सरकार करीत आहे. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. काँग्रेस पक्षाचा उज्वल इतिहास नव्याने पुढे आणला पाहिजे. काँग्रेससाठी सच्चा भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे शिबिर भरवून गावोगावी काँग्रेसचे विचार पोहचविले पाहिजे.’’

Leave a Reply