fbpx
Monday, May 20, 2024
Latest NewsPUNE

महाविद्यालयातील ग्रंथपाल पदाच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचा बेमुदत उपोषणाचा इशारा

पुणे: अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल पदाची भरती ही  प्राचार्य पदाच्या भरती च्या धर्तीवर सुरू करणे .व  4 मे 2020 रोजी पद भरती वर निर्बंध लादण्या अगोदर या महाविद्यालयांना शासन नियमानुसार पदभरतीची परवानगी मिळाली आहे. अशा महाविद्यालयातील पदाच्या मुलाखती साठी तातडीने परवानगी द्यावी. तसेच खाजगी विना अनुदानित संस्थेमधील ग्रंथपालांना समान काम समान वेतन हे धोरण ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केली वेतन श्रेणी नुसार वेतन मिळाले. या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे अध्यक्ष रवींद्र भताने यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र ग्रंथपाल महासंघाचे उपाध्यक्ष गजानन खराटे, अमोल वरपे, नेताजी मस्के, प्रवीण पंडित उपस्थित होते.
रवींद्र भताने म्हणाले, ग्रंथालय महाविद्यालयाचा आत्मा समजला जातो महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी ग्रंथपाल महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
मात्र महाविद्यालयातील एवढे महत्त्वाचे पद गेल्या अनेक वर्षापासून चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत  यांनी 27 जून रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आठ दिवसात पदभरतीचा निर्णय काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र त्यावर कसलीच कारवाई झालेली नाही.

महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या मागण्या
1)2020 पर्यंत राज्यातील अनुदानित व वरिष्ठ महाविद्यालयातील रिक्त ग्रंथपाल पदाची भरती करण्यात यावी.
2) खाजगी व स्वायत्त अभियांत्रिकी पॉलिटिकल आयुर्वेदिक नर्सिंग डी फार्मसी, बी फार्मसी, बी एड, डी एड  ,व इतर महाविद्यालयातील ग्रंथपाल पदाच्या जागा रिक्त आहेत अशा ठिकाणी कर्मचारी नियुक्त करून सदर जागा विद्यापीठ नियमानुसार करण्यात येत नाही तरी या संस्थांमध्ये ग्रंथपाल पदावर सेट-नेट पी, एचडी धारकांना प्राधान्य देऊन नियमित वेतनश्रेणी नुसार त्यांची नियुक्ती करण्यात यावी.
3) दिनांक 4मे 2020 च्या अगोदर ज्या महाविद्यालयात पद भरतीसाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे त्यांना पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी देण्यात यावी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading