fbpx
Wednesday, May 8, 2024
Latest NewsPUNE

विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर स्वीप कार्यक्रम प्रभावीपणे राबवा -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे


पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या मतदारांची पध्दतशीर शिक्षण व सहभाग (स्वीप) हा कार्यक्रम विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे प्रतिपादन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीबाबतची बैठक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी देशपांडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कुलगूरु डॉ.नितीन करमळकर, उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, स्वीपचे राज्य सल्लागार दिलीप शिंदे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत ,विद्यापीठातील विविध विभागांचे विभाग प्रमुख व सहप्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी देशपांडे म्हणाले, महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी हा भावी मतदार असतो. त्यांच्यामध्ये मतदान आणि लोकशाही याविषयी जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी स्वीप कार्यक्रम राबवित आहोत. मतदार नोंदणी ते मतदान याव्दारे मतदारांचा सहभाग वाढविणे. यासाठी निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करणे व सक्षमीकरण करणे, एनएसएसचा सहभाग घेणे, प्रमाणपत्र / क्रेडीट अभ्यासक्रम सुरु करणे, स्टुडिओची उपयोगिता आदीव्दारे मतदान जनजागृती करावी, असेही श्री. देशपांडे यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठातील विभाग प्रमुखांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाबाबतचे आपल्या विचारांचे आदान प्रदान केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading