पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 119 नवीन रुग्ण
पुणे: शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे.आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आलीआहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पण कमी होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 119नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 236रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 89हजार 021 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख78 हजार119इतके रुग्ण बरे झाले आहेत, पुण्यात गेल्या 24 तासात 11रुग्णांचा मृत्यू झाला आहे,यामध्ये शहरातील7तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8816जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2086अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 119रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6313 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत.
