‘फार्मसी मधील करियर संधी ‘ विषयावर वेबिनार
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ‘फार्मसी मधील करियर संधी ‘ विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा वेबिनार मोफत असून १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे . फार्मसी विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील ,अशी माहिती प्राचार्य डॉ किरण भिसे यांनी दिली. बारावी शास्त्र शाखेमध्ये प्रवेश घेतलेले किंवा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतील .
http://forms.gle/kd3ft3qJNR8YEySN7 या लिंकवर नोंदणी करता येईल ,https://meet.google.com/qyb-shxx-ngj या लिंक द्वारे सहभागी होता येईल .
