Pune Unlock – मॉलसह सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
पुणे : पुणेकर, व्यापारी ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत होते. ते अखेर आज घडले असून उद्यापासून पुणे अनलॉक होत असल्याचे ट्विट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
महापौरांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, मागणी मान्य, उद्यापासून पुणे अनलॉक ! – सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार – हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार – शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी – मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश
मागणी मान्य, उद्यापासून पुणे अनलॉक !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 8, 2021
– सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
– हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
– शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी
– मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश
