Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

Pune – गेल्या 24 तासात कोरोनाच्या 304 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे:  शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी होत आहे.आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत  आलीआहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची  संख्या  पण कमी होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 220नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे. तर 304रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.


पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 88हजार 902 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख77  हजार883इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 9रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील7तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत पुणे शहरात 8813जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2206अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. यामध्ये 202रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7640 स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading