जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीला भारतात मान्यता; एक डोस पुरेसा असल्याचा कंपनीचा दावा
नवी दिल्ली : कोरोना विरोधातील लढ्यात भारताला आणखी बळ मिळणार आहे. केेंद्र सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या एक डोस कोविड-19 लसीला भारतात आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे, अशी माहिती केेंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करुन दिली आहे. त्यामुळे भारताकडे आता कोरोनाविरोधातील लढाईत कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, मॉडर्ना, स्पुटनिकसह जॉन्सन अँड जॉन्सन या लसीचाही समावेश झाला आहे.
केेंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारताने आपली व्हॅक्सिन बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या एक डोस कोविड-19 लसीला भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारतात कोरोनाविरोधात 5 लसींना परवानगी आहे. यामुळे देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला पाठबळ मिळेल. दरम्यान, भारतात परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन ही पहिलीच एक डोस लस असून दोनच दिवसांपूर्वी कंपनीने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या लसीचा एक डोस प्रभावशाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच कोरोनावर जॉन्सन अँड जॉन्सनची लस 85 टक्के प्रभावी आहे, असेही कंपनीचे म्हणणे आहे. तसेच दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही ही लस प्रभावशाली असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
India expands its vaccine basket!
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 7, 2021
Johnson and Johnson’s single-dose COVID-19 vaccine is given approval for Emergency Use in India.
Now India has 5 EUA vaccines.
This will further boost our nation's collective fight against #COVID19
