ड्रग्स तस्करी प्रकरणात दोघांना अटक, एनसीबीची मोठी कारवाई
मुंबई : ड्रग्स तस्करी प्रकरणात आज एनसीबी (Narcotics Control Bureau)ने मोठी कारवाई केली. एनसीबीने खारघर आणि डोंगरी भागात दोन ड्रग पेडलर्सना अटक केली आहे. यामध्ये एका नायजेरीयन व्यक्तीचा समावेश आहे. यावेळी आरोपींकडून 50 लाख रुपयाचे कोकेन जप्त करण्यात आले. दरम्यान, या कारवाईत एनसीबीचे दोन अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळाललेल्या माहितीनुसार, एनसीबीला खारघर आणि डोंगरी भागात ड्रग्स तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून या तस्करांना अटक करण्यात आली. यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत एनसीबीचे दोन अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत.
