Wednesday, November 18, 2026
BusinessLatest News

सोनू सूद यांनी छोट्या व्यवसाय मालकांना आधार देण्यासाठी सुरू केले ‘ट्रॅव्हल युनियन’

मुंबई: भारतातील पहिले ग्रामीण बी२बी प्रवास तंत्रज्ञान व्यासपीठ (ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म) ट्रॅव्हल युनियन आज सुरू करण्यात आले. सोनू सुदने पुढाकार घेऊन सुरु केलेले ट्रॅव्हल युनियन ट्रॅव्हल युनियनच्या सदस्यांना प्रत्येक जिल्हा, जिल्हा-उपविभाग आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण प्रवाशांच्या प्रवासी गरजा पूर्ण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करून प्रवासी सेवांचे लोकशाहीकरण करेल. शून्य गुंतवणुकीद्वारे ग्रामीण भारतात अग्रगण्य प्रवासी अभिकर्ता व्यवसाय समुदाय उभारणे, त्यास आधार देणे, त्याचे डिजिटल सशक्तीकरण करणे हे ध्येय ठेवून १ अब्ज भारतीय लोकसंख्येला सेवा देणारे सर्वात मोठे ग्रामीण डिजिटल प्रवासी सेवा व्यासपीठ तयार करणे हे ट्रॅव्हल युनियनचे उद्दिष्ट आहे.

कडाऊन दरम्यान मला प्रवास करते वेळी ग्रामीण भारतीय सामोरे जात आलेल्या आव्हानांचा तसेच लहान व्यवसाय मालकांच्या संघर्षांचा प्रथमच प्रत्यक्ष अनुभव आला. भारताच्या गरजा पूर्ण करण्याच्या आणि ग्रामीण नागरिकांच्या डिजिटल गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावांचा अभाव माझ्या लक्षात राहिला. वास्तविक, सध्या ग्रामीण ग्राहकांना त्यांच्या प्रवासाची पूर्व योजना करण्याचा पर्याय नाही आणि विविध प्रकारच्या प्रवासाच्या गरजांसाठी एकाहून अनेक कार्यालयांकडे धाव घ्यावी लागते. मी ट्रॅव्हल युनियनची कल्पना केली आहे, जेणेकरून आपण प्रवासातील सर्व अडथळे दूर करू शकू आणि ज्यांना प्रवास उद्योगात आपली कारकीर्द सुरू करायची आहे अशा देशातील कोणालाही उद्योजकतेची संधी देऊ शकू. ट्रॅव्हल युनियन म्हणजे बी२बी प्रवास तंत्रज्ञान व्यासपीठ हे ग्रामीण प्रवास अभिकर्त्यांपर्यंत पोचविणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो त्यांना त्यांच्या परिसरास सर्वोत्तम प्रवास देऊ करण्यास प्रदान करण्यास सक्षम करतो.

विद्यमान ग्रामीण उद्योजकांसाठी हा उत्पन्नाचा एक अतिरिक्त स्त्रोत असू शकतो किंवा महत्त्वाकांक्षी व्यक्तींसाठी भक्कम पाया असू शकतो. भारताच्या अंतर्भागात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे माझे स्वप्न पुढे नेले आहे, जेणेकरून ग्रामीण तरुण हे नागरी शहरांमध्ये स्थलांतरित न होता त्यांच्या स्थानिक अर्थव्यवस्थांचा विकास करू शकतील. ट्रॅव्हल युनियनच्या सहाय्याने आम्ही भारतातील ग्रामीण जनतेमध्ये स्वावलंबन सक्षम करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने डिजिटल भारत उभारण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकत आहोत.”

Leave a Reply