महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षाकवच योजनेला वाढ
पुणे: कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजना यासाठी कार्यरत असलेल्या महापालिकेचे अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षाकवच योजनेला मुदतवाढ दिली आहे.
कोरोना विषाणू संसगत्य रुग्णांची प्रत्यक्ष संबंध येऊन महापालिका कर्मचारी, किंवा अधिकाऱ्यांनाही त्यांची लागण होत होती त्यामध्ये प्रकृती गंभीर असून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख रुपये विमा म्हणून रक्कम दिली जाते.
केंद्राने राज्य सरकार या योजनेला जो पर्यंत मुदत वाढ देईल. तोपर्यंत किंवा भारतीय रोग कायद्यानुसार जोपर्यंत साथ आटोक्यात आल्याची घोषणा सरकार करत नाही तोपर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
