महिला कॉँग्रेसच्या वतीने पुरग्रस्तांना मदत
पुणे : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस तर्फे पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्त भागांमध्ये पूरग्रस्त लोकांसाठी अन्नधान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तू ब्लँकेट, बेडशिट, सोलापुरी चादर अशा सर्व वस्तू सांगली, सातारा व कोल्हापूर येथे पाठवण्यात आल्या सकाळी ९.०० वा., महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा माननीय श्रीमती. संध्याताई सव्वालाखे यांनी फ्लॅग ऑफ करून ५ गाड्या सांगली, सातारा व कोल्हापूरकडे रवाना झाल्या.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी आमदार श्रीमती दिप्ती चवधरी, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस संगीता तिवारी, नगरसेविका पूजा आनंद, पुणे जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा सावंत आदींसह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
