येरवडा भागातील घरेलु कामगार महिलांचे कोरोना लसीकरण
पुणे : महापालिका, शिवसेना व क्रांतिवीर लहुजी
वस्ताद मित्र मंडळाच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 6 मध्ये येरवडा भागातील 200 घरेलू कामगार महिलांना मोफत कोविशिल्ड लस देण्यात आली.
वीर लहुजी वस्ताद सभागृह येथे हा कार्यक्रम पार पाडला.यावेळी पुणे शहर सह संपर्कप्रमुख अजय
भोसले,शहरप्रमुख संजय मोरे,उपशहर प्रमुख आनंद गोयल,माजी नगरसेवक राष्ट्रवादी नेते शिवाजी शिरसागर, सुनील जाधव,प्रभाग प्रमुख राजेश एरंडे, इमाम शेख,विलास नलावडे,बाळू मोहिते, फय्याज खान,बंटी दोरे,उमेश मोरे, सुफियान शेख आदि कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ समन्वयक शैलेश उर्फ पाला मोरे यांनी केले
