Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRA

बांधकाम प्रकल्पांना आणखी सहा महिने मुदतवाढ

पुणे : महारेराने (Maharashtra Real Estate Regulatory Authority) १५ एप्रिल २०२१ व त्यानंतर पूर्ण होणा-या बांधकाम प्रकल्पांना आज आणखी सहा महिने मुदतवाढ दिली.  यामुळे बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. करोनाच्या दुसऱ्या लांटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिकांकडून कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मुदत वाढीची मागणी केली जात होती. त्यानुसार ज्या प्रकल्पांच्या पूर्णत्वाची तारीख, सुधारित समाप्तीची तारीख आणि विस्तारित पूर्ण होण्याची तारीख १५ एप्रिल २०२१ रोजी किंवा त्यानंतर संपली आहे अशा प्रकल्पांची नोंदणी वैधता 6 महीने वाढवण्यात आली आहे. तर १५ एप्रिल २०२१ पूर्वी पूर्ण होणा-या बांधकाम प्रकल्पांना ही मुदतवाढ मिळणार नाही. दरम्यान, क्रेडाई पुणे मेट्रोने महारेरा व राज्यसरकारकडे ही मर्यादा वाढवून देण्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या नवीन सुविधेमुळे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निश्चित मदत होणार आहे.

बांधकाम व्यावसायिक क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा

“महाराष्ट्रात आलेली कोविडची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा गंभीर स्वरूपाची होती. राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांमुळे या काळात बांधकाम व्यवसाय क्षेत्र कठीण काळातून गेले. बांधकाम मजूर परत न येणे, लॉकडाऊन, बांधकाम साहित्य वेळेत न मिळणे यांसारख्या अनेक गोष्टींचा सामना या दरम्यान बांधकाम व्यावसायिकांनी करावा लागला. क्रेडाई पुणे मेट्रोने महारेरा व राज्यसरकारकडे ही मर्यादा वाढवून देण्याची मागणी केली होती. आजच्या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.”

– अनिल फरांदे (अध्यक्ष, क्रेडाई, पुणे मेट्रो)  

Leave a Reply