Wednesday, November 18, 2026
Latest NewsNATIONALSportsTOP NEWS

महिला हॉकी संघ दलित बहुल असल्याने पराभव झाल्याचा आरोप, पराभवानंतर वंदना कटारियाच्या घराबाहेर राडा

दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये, संपूर्ण देश हा उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत असताना, संघाच्या पराभवानंतर हरिद्वारच्या रोशनबादमध्ये एक अत्यंत लाजिरवाणी घटना घडली. महिला हॉकी पटू वंदना कटारियाच्या घराबाहेर काही लोकांनी फटाके फोडल्याचा आणि वंदनाच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर महिला हॉकी संघ हा दलित बहुल संघ असल्याने हरला असल्याचे वंदनाच्या कुटूंबियांना सुनावण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, वंदनाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की काही तरुणांनी त्यांच्या घराबाहेर फटाके फोडले. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. वंदनाच्या कुटुंबीयांनी युवकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जर आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला नाही तर आम्ही आत्महत्या करु असेही कुटुंबियांनी म्हटले आहे.

रोशनबाद गावात राहणारी वंदना कटारिया भारतीय महिला हॉकी संघात खेळत आहे. वंदनाने फक्त उपांत्यपूर्व सामन्यात हॅटट्रिक मारून भारतीय संघाला केवळ उपांत्य फेरीत नेले नाही, तर ती ऑलिम्पिकमध्ये हॅटट्रिक करणारी पहिला खेळाडू ठरली आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाने अर्जेंटिना संघाला पूर्ण ताकदीने लढत दिली. खडतर सामन्यात भारताचा संघाचा २-१ ने पराभूत झाला.

 

Leave a Reply