‘राष्ट्र सेवा मंथन २०२१’ दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात
पुणे : भारत विकास संगम व महा एनजीओ फेडरेशन यांच्यावतीने राष्ट्रसेवा मंथन २०२१ या विशेष राज्यस्तरीय दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक ७ आणि रविवार, ८ आॅगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील मरकळ येथील आर्ट आॅफ लिव्हिंगच्या त्रिवेणी आश्रमात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला प.पू. श्री श्री रविशंकर आॅनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. प्रकृती आणि त्याला अनुषंगून मानवाचा विकास कसा करता येईल, या विषयावर विविध मान्यवर बोलणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक व महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.
शनिवार, दिनांक ७ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता उद््घाटन व प्रथम सत्र होणार आहे. यामध्ये प.पू. श्री श्री रविशंकर आॅनलाईन पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. तर, व्यासपीठावर भारत विकास संगमचे संस्थापक के.एन.गोविंदाचार्य हे मेरा गाव मेरा देशा मेरा जिल्हा मेरी दुनिया प्रकृती केंद्रीत विकास की और याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
मरुस्थल विकास की यशस्वी यात्रा, शाश्वत विकास की गंगोत्री भारत विकास संगम, जनसहकार एवम ज समृद्ध खेत खलीयान, शिक्षा विश्व मानव निर्माण की साधना, शिक्षण साहित्य व ज्ञानाची समान संधी, आदिवासी समाज, सेवा सत्संग और साधना का महत्व, सशक्त विकास की दिशा समाज आगे-सत्ता पिछे, गीता उपदेश, सशक्त राष्ट्र निर्मीतीसाठी निरोगी माता व सुदृढ बालक, विषमुक्त खेती अशा विविध विषयांवर मान्यवर विचार मांडणार आहेत.
