Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

“विनामूल्य लसी वाढवा अन्यथा ‘धन्यवाद मोदी’ या जाहिरातींना काळे फासू” – गोपाळदादा तिवारी यांचा इशारा


पुणे : विनामूल्य लसी दाबून ठेवून विकतच्या लसींचा पुरवठा केला जात आहे. व जाहिराती मात्र धन्यवाद मोदी अशा सुरू आहेत. विनामूल्य लशींचा पुरवठा वाढवा अन्यथा जाहिरात फलकांना काळे फासू असा इशारा राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने देण्यात आला.

समितीचे अध्यक्ष गोपाळदादा  तिवारी म्हणाले, मनपातील सत्ताधारी भाजपने लसींचे वाटप मनपा केंद्रातून किमान मोदी सरकारच्याच जाहीरात बाजी प्रमाणे करून मोफत लस सर्वांना लस हे करोडोंच्या पेट्रोल पंपावरील फलके, वृत्तपत्रे व दूरदर्शन / आकाशवाणी/ टीव्ही चॅनेल्स वरील जाहीरात बाजींची फल निष्पत्ती करून दाखवावी व मगच मोफत लसींची जाहीरात बाजी करावी. अन्यथा आम्ही पुणेकर इतके निर्बुध्द, निलाजरे व बिनडोक नाही आहोत. जे मोफत लसीकरण व धन्यवाद मोदीजी हे सरकारी कर रूपी पैशातून चाललेला आभासात्मक तमाशा बघतच रहात बसू व पैसे देऊन विकत लसी घेऊन पुन्हा आपल्या नांवे मोफत लसी घेतल्या म्हणून अंध पणे टाळ्या वाजवतच बसू.!! हा समज भाजपा राज्यकर्त्यांनी बाळगू नये.

मोफत लसींचा पुरवठा न झाल्या आम्ही पुणेकर सरकारी खर्चाने लावलेल्या मोफत लस धन्यवाद मोदीजी जाहीरातींच्या बोर्डावर काळी निशाने लावू. कारण पूर्वी उत्पादकाच्या खाजगी हॉस्पिटलला केंद्राची मान्यता घेऊन लसी पूरवीत होत्या परंतु ते देखील केंद्र सरकारने उत्पादक कंपन्यांकडून काढून घेऊन स्वत: केंद्र सरकार विकतच्या लसी पुरवत आहे. त्यामुळे मोफत लसी देण्याची नैतिक जबाबदारी केंद्राचीच आहे. या प्रसंगी, राजीव गांधी स्मारक समिती सदस्य सर्वश्री रामचंद्र (भाऊ साहेब) शेडगे, सुभाष थोरवे, सुरेश अप्पा शेवाळे, संजय अभंग, भोला वांजळे, नितीन पायगुडे, महेश अंबिके, राजू नाणेकर, आशीश गुंजाळ, ऊदय लेले इ उपस्थित होते…

२१ मे ते २ ऑगस्ट पर्यंत पुणे मनपा हद्दीत सरकारी मोफत लसीकरण फक्त ६,५०,६९४ मात्र खाजगी हॉस्पीटल मधील पुणेकरांनी नाईलाजाने विकत घेतलेले लसीकरण संख्या ८,८७,८५२ एवढी आहे. १२ जुलै नंतर काँग्रेस ने यावर आवाज ऊठवल्यावर जुलै महिन्यात मोफत लसींचे प्रमाण किंचित वाढल्याचा दावा देखील गोपाळदादा  तिवारी यांनी केला. २१ मे पुर्वी (२० मे अखेर) मनपाने सरकारी केंद्रावरून दिलेल्या मोफत व खाजगी हॉस्पीटल मधून १२५० प्रमाणे घेतलेल्या विकत अशा दोन्ही मिळून झालेले लसीकरण ९,५१,१४९ इतके आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading