Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यातील महाविद्यालये ऑफलाईन सुरू होणार – उदय सामंत

पुणे: व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा 26 ऑगस्ट पासून होणार आहे. तर इंजिनिअरिंगची सीईटी परीक्षा 4 ते 9 सप्टेंबर आणि 9 ते 14 सप्टेंबर या दोन सत्रात होणार आहे. एलएलबी सीईटी 16 ते 9 सप्टेंबर पासून सुरु होणार . आठ दिवसांत अभ्यास करुन ज्या ठिकाणी कोविड पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, त्या ठिकाणचे ऑफलाइन कॉलेज सुरु करण्याच्या सूचना कुलगुरुंना दिल्या आहे.अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

उदय सामंत पुढे म्हणाले, विद्यापीठातील जिल्ह्यांना महाविद्यालये सुरु करण्याचे निकष वेगळे असणार आहेत. विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही सामंत म्हणाले.
खासगी महाविद्यालयांना फी कमी करण्याच्या सूचना द्याव्या लागतील. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यावर फी किती कमी करायची ते सांगितलं जाईल, अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली आहे. कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या संपुर्ण शिक्षणाचा खर्च विद्यापीठ करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
प्रोफेशनल कोर्ससाठी 26 ऑगस्ट 2021 पासून सीईटीची प्रक्रिया सुरु होईल. मात्र, या तारखा आम्ही संबंधित यंत्रणांशी बोलून नक्की करणार आहोत. मागील वर्षी ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी नव्हती त्या अभ्यासक्रमांना यावेळेस देखील सीईटी नसेल. राज्याच्या वित्त विभागाकडून होकार मिळाला की प्राध्यापकांची भरती केली जाईल.

सीईटी परिक्षा या ऑनलाईन होतील. पण त्या सेंटरवर जाऊन द्याव्या लागतील. घरातून देता येणार नाहीत. त्यासाठी सीईटीची सेंटर्स वाढवण्याचा आमचा विचार आहे. शासन आणि विद्यापीठ एकत्र चालली पाहिजेत.
राज्यपालांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आढावा घेणं हा त्या पदाचा कमीपणा आहे असेही सामंत म्हणाले.

Leave a Reply