‘हेल्प रायडर्स’कडून महाडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत
सागरराज बोदगिरे/ पुणे
महाडमधील पूरग्रस्तांना पुण्यातील हेल्प रायडर्सकडून पहिल्या टप्प्यात ६०० कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्तू, पाण्याच्या ७०० बॉक्सची मदत करण्यात आली.
कोथरूड येथून पूरग्रस्त ६०० कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंसह पाण्याचा साठा आणि हेल्प रायडर्सचे ३५ स्वयंसेवक संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांच्या नेतृत्वाखाली महाडला रवाना झाले.यावेळी सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे उल्हास रानडे, चंद्रशेखर चिंचोरे, जयश्री वानखेडे, गौरव बेडसगांवकर, राहुल जाधव, दुर्गाप्रसाद कनोजिया, जयंती अलुरकर ,पवन कनोजिया आदींसह नागरिक उपस्थित होते. महाडसह खरवली, सुतारवाडी, पंचशीलनगर, पोलादपूर, किंजलनगर, ब्राम्हणवाडी आदी पूरग्रस्त भागात ही मदत पोहचविण्यात आली. प्रशांत कनोजिया, सुदिन जायप्पा,अजित जाधव, प्रवीण पगारे , अनुपम शहा, श्रीकांत कापसे , बाळासाहेब ढमाले,प्रशांत महानवर, अमोल गुंजाळ,संतोष पोळ, राहुल वाघवले ,विनायक मुरुडकर ,सचिन पवार श्रीकांत कुंभरे,उमेश थरकुटे,आकाश साळुंखे,निलेश टिंगरे,माधव चौधरी ,सुयोग ऐंचवार,परेश देशमुख निरंजन शिवरकर ,सौरभ भिलारे,केतन डोंगरे,विक्रम घुंगरूवाले,प्रसाद गोखले,निवास शिंदे,महेश बैजंत्री, प्रथम कनोजिया ,आदींसह सदस्यांनी नियोजन केले. दुसऱ्या टप्प्यात चिपळूण, खेडमधील बाधितांसाठी मदत करण्यासाठी हेल्प रायडर्सचे पथक जाणार असून मदतीसाठी पुणेकरांनी उत्स्फूर्त योगदान दिले आहे त्यांचे मनापासुन धन्यवाद, आता पुढील कोल्हापुर -चिपळुण पुरग्रस्थांना मदतीचे नियोजन चालु आहे
… पूरग्रस्तांसाठी असेही योगदान !
हेल्परायडर्स कोकणात जाण्यासाठी आशिष मते यांनी डिझेल व ड्रायव्हर मानधन घेऊन
टेम्पो ट्रव्हलर उपलब्ध करुन दिली. जीवनावश्यक वस्तूंचा साठा घेऊन निघालेल्या हेल्प रायडर्सच्या वाहनांसाठी, इंधनाचे पैसे नाकारून भुकूम येथील भारत पेट्रोल पंपाचे मालक सचिन डेंग यांनी मदतकार्यात मोलाचे योगदान देऊन समाजाप्रती कर्तव्य बजावले.
