fbpx
Saturday, May 11, 2024
Latest NewsPUNE

Pune – ऐन पावसाळ्यात उरुळी (देवाची)च्या नागरिकांची पाण्यासाठी कसरत

पुणे : महाराष्टात ओला दुष्काळ असल्यासारखी परिस्थिती आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे जवळपास भरलेली आहत. पण तरीही उरुळी देवाची येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. अनेकदा निवेदन, पत्र देऊनही येथील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. पाईपलाईन असूनही नागरिकांना पाण्याचा टँकर बोलवावा लागत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या टँकरवर होणारी गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर पाईपलाईनने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी भारिप चे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. मात्र अद्यापही त्यावर काहीच उपाय योजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या चार दिवसात मागणी मान्य न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी दिला आहे. 

ऊरूळी देवाची गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी पुणे महानगर पालीकेच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आलेले आहे. शिवाय 10 दशलक्ष लिटर ची पाण्याची टाकिही कचरा डेपोजवळ बांधून बऱ्याच दिवसापासून तयार आहे. मात्र, अद्यापही उरुळी देवाची येथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावीच लागत आहे. कचराडेपो परिसरात नलीकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्या प्रमाणे ऊरूळी देवाची गावास का केला जाऊ शकत नाही. सद्याची परिस्थिती करोनामुळे गंभीर आहे.पुण्यातील वाढता कोरोना चा धोका लक्षात घेऊन जिथे जिथे गर्दी टाळता येईल तिथे गर्दी टाळू शकतो व कोरोनाला आला घालू शकतो. त्याप्रमाणे उरुळी देवाची येथील टँकर बंद करून परिसरातील नागरिकांना गर्दीपासून रोखणे शक्य आहे. तरीही महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अतुल बहुले यांनी केला आहे.

करोनाच्या काळात टॅंकरवर गर्दी करून पाणी भरणे धोक्याचे आहे. शिवाय सद्या पावसाळी दिवस असल्यामुळे अजूनही लोकांना त्रास होऊ शकतो. कामगार लोकांना पाणी भरल्याशिवाय कामाला जाता येत नाही ,पाण्यासाठी लहान मुलांना ही टँकर वर चढून पाणी भरावे लागते. यामुळे लोकांन्ना कोरोनाची लागण होवु शकते. त्यामुळे त्वरित नलीकेद्वारे पाणी ग्रामस्थांना सुरु करणेत यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading