Sunday, June 14, 2026
Latest NewsNATIONALSportsTOP NEWS

Tokyo Olympic 2020 -21: तब्बल चार दशकानंतर भारतीय हॉकी टीम कडून इतिहासाची पुनरावृत्ती, ग्रेट ब्रिटनला हारवून सेमी फायनलमध्ये धडक 

टोकियो : Tokyo Olympic 2020 -21मध्ये आज भारताच्या वाट्याला दोन आनंदाचे क्षण आले. भारताची बॅडमिंटन पटू पी. व्ही. सिंधू ने कांस्य पदकाची कमाई केली. तर हॉकी टीमने ग्रेट ब्रिटनला हारवून सेमी फायनलमध्ये धडक मारली. विशेष म्हणजे तब्बल चार दशकानंतर आपली हॉकी टीम सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी 1980 मध्ये मॉस्को ऑलिम्पिक सामन्यात भारतीय पुरूष हॉकी संघाला अंतिम चारमध्ये स्थान मिळविता आले होते. इतकेच नव्हे तर त्यावेळी भारतीय संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यामुळे यंदाही भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या  आहेत. 

आज भारताने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनच्या संघाला ३-१ असे पराभूत केले आणि ऑलिम्पिक स्पर्धेचे सेमीफायनलचे तिकीट मिळवले. दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक सिंग या तिघांनी भारताकडून प्रत्येकी एक-एक गोला केला. सामना सुरू झाला तेव्हापासूनच भारतीय संघाने आक्रमणाला सुरूवात केली होती. भारतीय संघाने आक्रमक खेळ करत पूर्वार्धात २-० ने आघाडी घेतली. उत्तरार्धात संघातील काही खेळाडूंच्या चुकांमुळे ग्रेट ब्रिटनला एक गोल करण्याची संधी मिळाली. भारताने पुन्हा गोल करत सामना ३-१ असा जिंकला. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय संघ तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आता भारताचा पुढची सेमी फायनल बेल्जियम सोबत असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading