Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

Pune – गेल्या 24 तासात कोरोनाच्या 333 रूग्णांना डिस्चार्ज तर 256 नवीन रुग्ण

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी होत आहे.आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत  आलीआहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची  संख्या  पण कमी होत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 256 नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे. तर 333 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे. पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 87हजार 421 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 77 हजार 235इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 12रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 7 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8774 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2412 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. यामध्ये 221 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6617 स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply