Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गरजू महिलांना घरगुती साहित्याचे वाटप

पुणे : अण्णाभाऊंनी आयुष्यभर कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी आवाज उठवला त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या कडून गरजू महिलांना ज्येष्ठ नेते शंकरराव तडाखे यांच्या हस्ते गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. अण्णाभाऊंच्या १०१ व्या जयंती निमित्त तसेच लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनानिमित्त दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुनील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. 

यावेळी शिवाजीनगर भाजपा सरचिटणीस आनंद छाजेड, प्रभाग आठचे अध्यक्ष गणेश स्वामी, तुषार मोहिते, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, सुनील दैठणकर, मंगल चव्हाण, कुलसुंबी पठाण, रंजना दाभाडे, अरुणा सकट,  अनिल माने, जितेंद्र गायकवाड यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते शंकराव तडाखे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यिक आणि सामाजिक वारसा व्यापक आहे. अण्णाभाऊंनी मुंबई महाराष्ट्रात येण्यासाठी लढा दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अन्नाभाऊंनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या चळवळीला बळ देण्याचे काम केले. त्याचप्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान ही विसरता न येण्यासारखे आहे. त्यांच्या करारी बाण्याने त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. या दोन्ही महापुरुषांचा इतिहास प्रेरणादायी असून तरूणांनी यापासून बोध घेतला पाहिजे.

यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले, बहुजनांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडणाऱ्या कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या अण्णाभाऊंची आज जयंती आहे. त्यांनी आयुष्यभर उपेक्षितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महापुरुषांच्या विचारांना कृतीतून वंदन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणूनच आज अण्णाभाऊंच्या जयंती निमित्त तसेच लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त, इतर खर्चाला फाटा देत गरजू महिलांना संसारोपयोगी साहित्य  वाटप केले.  अण्णाभाऊंच्या शतक महोत्सवी जयंती निमित्त आम्ही कॅटलिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून अण्णाभाऊंचे साहित्य, त्यांचे जीवनचरित्र, त्यांची दुर्मिळ छायाचित्रे www.annabhausathe.com या वेबसाइटवर एका क्लीकवर उपलब्ध करून दिले आहे. अशाप्रकारची जगातली ही पहिली वेबसाईट आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading